Railway Worker Crushed in Bihar : बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी जंक्शन येथे भीषण अपघात घडला आहे. येथे रेल्वेच्या इंजिन आणि बोगीमध्ये अडकून एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतरचा एक व्हिडिओही समोर आला. यामध्ये एक रेल्वे कर्मचारी इंजिन आणि बोगीमध्ये अडकलेला दिसतोय. रविवारी (१० नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता हा अपघात घडला.

ही संपूर्ण घटना बरौनी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर घडली. लखनौ-बरौनी एक्स्प्रेस ट्रेनच्या इंजिन आणि बोगीच्या मध्ये चिरडून तरुणाचा मृत्यू झाला. अमर कुमार (४०, रा. बरौनी कॉलनी) असे मृत रेल्वे कामगाराचे नाव आहे. वडिलांच्या निधनानंतर अमरला ही नोकरी मिळाली होती. अमरच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतरच अमरला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई

हेही वाचा >> ‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला

कपलिंग उघडत असताना अपघात झाला

अमरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचले. मुलाच्या मृत्यूनंतर पायलट घटनास्थळावरून पळून गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अपघाताबाबत सांगितले जात आहे की, रविवारी सकाळी ट्रेन बरौनी जंक्शनवर आली होती. दरम्यान, अमर हा रेल्वे इंजिन आणि बोगीमधील कपलिंग उघडण्यासाठी गेला होता. त्यानंतर लोको पायलटच्या निष्काळजीपणामुळे अमर मध्येच चिरडला गेला आणि त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर लोको पायलटने घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

इंजिन आणि बोगीमधील कपलिंग उघडत असताना लोको पायलटने इंजिन पुढे जाण्याऐवजी मागे हलवले होते. त्यामुळे तो मध्येच चिऱडला गेला. घटनेनंतर लगेचच प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या लोकांनी लोको पायलटला या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर लोको पायलटने मृत अमरला तिथेच सोडून पळ काढला. यानंतर घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुमारे दोन तासांनंतर मृतदेह बाहेर काढला.

त्याचवेळी रेल्वेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अमर कुमारला वर्षभरापूर्वी नोकरी मिळाली होती आणि त्याचे १२ डिसेंबरला लग्न होणार होते.