Raipur Accident : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात १० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

रायपूर-बालोद बाजार रोडजवळ हा भीषण अपघात झाला. एका कार्यक्रमातून परतणाऱ्या माझदा वाहनाला एका ट्रेलरने जोराची धडक दिली. या अपघातात १० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

रायपूरचे पोलीस अधीक्षक उम्मेद सिंह यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितलं की, एक ट्रक चौथिया छट्टी येथून एका कार्यक्रमानंतर परतत असताना हा अपघात झाला. दरम्यान, रविवारी रात्री १२.१५ वाजता हा अपघात झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. चटौड गावातील ग्रामस्थ स्वराज माझदा गाडीने लग्न समारंभाला उपस्थित राहून परतत असताना हा अपघात झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने माझदा गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की माझदा गाडीमधील अनेक लोकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वर्षापेक्षा कमी वयाच्या एका मुलाचाही समावेश आहे. अपघाताच्या वेळी माझदा गाडीत ५० लोक असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठा आरडाओरडा आणि गोंधळ झाला होता.