Sonam Raghuvanshi Was Present During Raja Raghuvanshi Killing: इंदूर येथील राजा रघुवंशी याच्या हत्येतील चार आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे इंदूर गुन्हे शाखेने मंगळवारी सांगितले. पोलीस अधीक्षक पूनम चंद यादव यांच्या मते, आरोपींनी केवळ हत्या केल्याची कबुली दिली नाही, तर यावेळी राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशी घटनास्थळी उपस्थित होती आणि “सोनम पतीची हत्या होताना ते सर्व पाहत होती”, असेही सांगितले आहे.

“चारही आरोपींनी राजा रघुवंशी याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. राजा रघुवंशींवर पहिला वार विशाल उर्फ विकी ठाकूरने केला. चौकशीदरम्यान आरोपींनी राजा रघुवंशींवर कसा हल्ला केला आणि नंतर त्यांचा मृतदेह खोल दरीत कसा फेकला, याचीही माहिती दिली आहे,” असे पोलीस अधीक्षक पूनम चंद यादव यांनी इंडिया टुडे टीव्हीशी विशेष संवाद साधताना सांगितले.

इंदूर गुन्हे शाखेच्या तपासानुसार, विशाल, आकाश आणि आनंद हे तिघे आरोपी इंदूरहून ट्रेनने निघाले. त्यांनी मेघालयात पोहोचण्यासाठी अनेक गाड्या बदलल्या, ते प्रथम गुवाहाटी आणि नंतर शिलाँगला गेले, असे पोलीस अधिक्षक पूनम चंद यादव यांनी स्पष्ट केले.

हत्येचा कट रचणारा सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाहा हत्येवेळी इंदूरमध्येच थांबला होता, परंतु त्याच्यावर आरोप आहे की त्याने तिघांनाही त्यांच्या प्रवास खर्चासाठी प्रत्येकी ४०,०००-५०,००० रुपये देऊन आर्थिक मदत केली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, ते राजाला मारत होते तेव्हा सोनम रघुवंशी घटनास्थळी उपस्थित होती आणि सर्व पाहत होती.

याचबरोबर पोलीस अधिक्षक पूनम चंद यादव यांनी नमूद केले की, हत्येनंतर सोनम मेघालयातच राहिली की इंदूरला परतली हे अद्याप स्पष्ट नाही. मेघालय पोलिसांनी अद्याप त्या तपशीलाची पुष्टी केलेली नाही.

दरम्यान, आरोपींच्या कुटुंबियांनी, विशेषतः राज कुशवाहाच्या, त्यांच्या मुलांनी राजा रघुवंशीच्या हत्येचे आरोप नाकारले आहेत. सोनम रघुवंशीच्या वडिलांनीही मेघालय पोलिसांवर आरोप केले असून, घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाझीपूर पोलिसांनी सोनम रघुवंशीला एका ढाब्यावरून अटक केली होती. त्यानंतर इंदूर पोलिसांनी सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह आणि त्याच्या इतर तीन साथीदारांना अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.