राजस्थानमधील झुंझुनूं शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक महिलेने आपल्या पतीचा खून केला आहे. महिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून त्रस्त होती. यातून पती-पत्नीमध्ये सतत भांडणं व्हायची. त्यात रागातून पत्नीने पतीचा खून केला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
बंटी वाल्मीकी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बंटी झुंझुनूं नगर परिषदेचे कर्मचारी होते. बंटी झुंझुनू शहरातील पीपली चौक येथील धर्मकांट परिसरात भाड्याच्या घरात पत्नी कवितासह राहत होते.शनिवारी दुपारी बंटी दुसऱ्या
महिलेबरोबर फोनवर बोलत होता. यातून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात कवितीने बंटीच्या डोक्यावर बँटने हल्ला केला. डोक्याला जोराचा मार लागल्याने रक्त आले आणि बंटी जागेवरच खाली पडला. यानंतर बंटीचा मृत्यू झाला. बंटीच्या मृत्यूनंतर पत्नीने एक डाव रचला.
समाजकंटकांनी बंटीचा खून केल्याचं म्हणत कविता जोर-जोरात ओरडायला लागली. यानंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. मृत्यूची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पण, कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही.
हेही वाचा : सात बाळांचा जीव घेणाऱ्या ब्रिटिश नर्सला जन्मठेप, कोर्टाचा निर्णय
पोलिसांचा कवितावर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी श्वान पथक तपासासाठी बोलावलं. बंटीला मारलेल्या बॅटचा वास श्वानाने घेतला. त्यानंतर श्वान कविताजवळ जाऊन थांबलं. पोलिसांनी कविताला अटक करत ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा कविताने खूनाची कबूली दिली.
हेही वाचा : बंदुकीच्या धाकाने धुळ्यात दरोडा; दागिन्यांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
झुंझुनूं पोलीस उपअधीक्षक शंकर लाला छाबांनी सांगितलं, बंटी आणि कविताचे १५ वर्षापूर्वी लग्न झालं होतं. दोघांना तीन मुलं आहेत. २०१२-१३ साली बंटी सफाई कर्मचारी म्हणून नगरपालिकेत कामाला लागला होता. तेव्हाच एका महिलेबरोबर त्याचे सुत जुळलं. दीड वर्षापूर्वी झुंझुनूं नगरपालिकेत बंटीची बदली झाली होती. यानंतर महिलाही बंटीबरोबर झुंझुनूं येथे आली होती. याची माहिती कविताला मिळाल्याने दोघांत सतत वाद व्हायचा.