नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये जिंकली आहेत. तर तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने तेलंगणात सत्तास्थापन केली असून रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी मात्र अद्याप तीनपैकी एकाही राज्यात सत्तास्थापन करू शकलेली नाही. भाजपा अद्याप त्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करू शकलेली नाही. मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे, सरोज पांडेय यांना राजस्थानचे पर्यवेक्षक म्हणून नेमलं आहे. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, के. लक्ष्मण आणि आशा लकडा यांना मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. तर अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनेवाल, दुष्यंत गौतम यांची छत्तीसगडचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पर्यवेक्षक आमदारांची बैठक घेतील. या बैठकीत सर्व आमदारांचं मत जाणून घेतील. त्यानंतर भाजपा हायकमांडच्या मंजुरीनंतर रविवारपर्यंत अंतिम निर्णय घेतील. रविवारीच मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली जाऊ शकते.

congress appoints sunil kanugolu as strategist in maharashtra
कानुगोलू यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी; कर्नाटक, तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार
Loksatta Chandani Chowkatun Dilliwala Appointment of new state president in Haryana
चांदनी चौकातून: कोणता मंत्री अध्यक्ष होणार?
akola , eknath shinde, eknath shinde news,
पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व
bjp eyes on Maharashtra Assembly Speaker post
विधान परिषद सभापतीपदाचा महायुतीत तिढा; तिन्ही पक्षांचा पदावर दावा
Nana Patole on Eknath Shinde
“राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”, नाना पटोलेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका
Vijay Wadettiwar
“…म्हणून मुंबईतील पावसात मंत्री, आमदार अडकले”, वडेट्टीवारांचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांना चिमटा
himanta biswa sarma
“वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याने…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हेमंत सोरेन, JMM-काँग्रेसवर हल्लाबोल
there is no appointment of full time union minister from rrs in state bjp
रा. स्व. संघाकडून प्रदेश भाजपमध्ये पूर्णवेळ संघटनमंत्र्यांची नियुक्तीच नाही, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्याकडेच जबाबदारी

मुख्यमंत्री निवडीबाबत भाजपामध्ये खलबतं चालू आहेत. तसेच विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भाजपाच्या ११ खासदारांनी लोकसभेचा राजीनामा दिला आहे. या खासदारांपैकी काही नेते तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

हे ही वाचा >> रेवंत रेड्डी यांचा शपथविधी; व्यासपीठावर ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती, लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर समर्थकांची गर्दी

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणारे नेते

राजस्थान : वसुंधराराजे सिंधिया, दिया कुमारी, ओम बिर्ला, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, बाबा बालकनाथ
मध्य प्रदेश : शिवराज सिंह चौहान, प्रह्लाद पटेल, नरेंद्र सिंह तोमर, कैलास विजयवर्गीय आणि ज्योतिरादित्य सिंधिया
छत्तीसगड : रमन सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष अरूण साव, रेणुका सिंह आणि ओ. पी. चौधरी