बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपीने न्यायाधीशांना चप्पल फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरतमधील एका कोर्टाने आरोपीला एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा ऐकून संतप्त झालेल्या २७ वर्षीय आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून फेकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सूरत येथील न्यायालयाने आज २७ वर्षीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष पॉक्सो न्यायाधीश पीएस काला यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी सुजित साकेत संतप्त झाला आणि त्याने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकली. पण त्याचा नेम चुकला आणि चप्पल दुसरीकडे बॉक्सजवळ पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आरोपीने ३० एप्रिल रोजी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. पीडित मुलगी एका स्थलांतरित मजुराची मुलगी होती. मुलगी एकटी दिसल्यावर आरोपीने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून हत्या केली होती. नंतर आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. कोर्टाने २६ साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाचा विचार करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape convict sentenced to life throws shoe at judge in gujarat court hrc
First published on: 29-12-2021 at 16:07 IST