How To Watch Planet Parade : आज रात्री म्हणजेच २५ जानेवारी रोजी आकाशात एक महत्त्वाची खगोलीय घटना घडणार आहे, ज्यामध्ये सहा ग्रह एका सरळ रेषेत एकत्र दिसतील, याला खगोलीय भाषेत प्लॅनेट परेड असे म्हणतात. या प्लॅनेट परेडमध्ये शुक्र, मंगळ, गुरु, युरेनस, वरुण आणि शनि या ग्रहांचा समावेश आहे.

दरम्यान हे ग्रह २१ जानेवारीपासून आकाशात सरळ रेषेत दिसत आहेत. पण, २५ जानेवारी रोजी रात्री ते एकमेकांच्या अगदी जवळ आल्याचे पाहायला मिळणार आहे. सध्या हे खगोलीय दृश्य लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे आणि त्यामुळे खगोलशास्त्रात रस असलेले लोक त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. खरंतर, या काळात शुक्र आणि शनि दोन अंशांच्या आत येताना दिसतील. ग्रहांचे संरेखन सामान्य असले तरी, दरवर्षी आकाशात इतके ग्रह एकत्र दिसत नाहीत आणि म्हणूनच खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक महत्त्वाची घटना आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्लॅनेट परेड म्हणजे काय?

रात्रीच्या आकाशात दोन किंवा अधिक ग्रह दिसू लागतात तेव्हा ग्रहांची एक फेरी (प्लॅनेट परेड) होते. ही या घटनेची अधिकृत खगोलशास्त्रीय व्याख्या नसली तरी, या प्रसंगी ग्रहांच्या दृश्यमानतेमुळे याला प्लॅनट परेड किंवा ग्रहांची फेरी म्हणतात. आकाशात आज जे ग्रह दिसणार आहेत त्यापैकी, गुरु ग्रह सर्वात तेजस्वी असेल, त्यानंतर मंगळ आणि शुक्र ग्रह असतील, ते सूर्यास्तानंतर त्यांची सर्वोच्च तेजस्वीता गाठतील. अहवालानुसार, बुध फक्त काही क्षणांसाठी चमकेल आणि नंतर अदृश्य होईल, तर शनी ठळकपणे दिसण्याची अपेक्षा आहे.

कशी आणि कुठे पाहायची प्लॅनेट परेड

इटलीचा ‘व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्ट’ २५ जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११:०० वाजता या प्लॅनेट परेडचे मोफत वेबकास्टिंग करणार आहे. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइट किंवा YouTube चॅनेलला भेट देत ही खगोलीय घटना पाहू शकता. खगोलशास्त्रज्ञ जियानलुका मासी या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून, ते दुर्बिणीद्वारे सर्व सहा ग्रहांचे थेट वेबकास्टिंग करतील. असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इटलीचा द व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रोजेक्ट हा रोबोटिक टेलिस्कोपद्वारे चालवला जाणारा एक प्लॅटफॉर्म आहे. जो जगभरातील रात्रीच्या आकाशाचे रिअल-टाइम, चित्तथरारक दृश्ये देतो. या प्रकल्पात तज्ञांच्या नेतृत्वाखाली थेट ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले जातात. उच्च दर्जाच्या खगोलशास्त्रीय सामग्रीसाठी ओळखला जाणारा हा प्रकल्प सर्वांसाठी खुला आहे. दरम्यान हा प्रकल्प २००६ मध्ये सुरू करण्यात आला होता.