काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी म्हटलं आहे की, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक अपमानजनक कमेंट केली होती. चौधरी यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “बघुया, आता न्यायालय किती तातडीने कारवाई करतंय…!”

चौधरी यांनी शेअर केलेला व्हिडीओ २०१८ मधला आहे. यात मोदी राज्यसभेच्या अध्यक्षांना म्हणत होते की, “रेणुकाजींना काही करू नका… रामायण मालिकेनंतर असं हास्य ऐकण्याचं सौभाग्य आज लाभलं आहे.” या वाक्याचा संदर्भ रामायण मालिकेतील शूर्पणखेशी (राक्षसी – रावणाची बहीण) होता. रेणुका चौधरी यांचा दावा आहे की, मोदींनी त्यांची तुलना शूर्पणखेशी केली होती.

मोदींच्या या कमेंटनंतर त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. मोदींनी या कमेंटसाठी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने तेव्हा केली होती. दरम्यान, रेणुका यांनी अचानक ५ वर्षांनी मानहानीचा खटला दाखल करण्याचा दावा उगीच केलेला नाही. कांग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना वापरलेल्या एका वाक्यामुळे त्यांच्यावर कोर्टाने कारवाई केली आहे. सुरत कोर्टाने मानहानीप्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवलं असून त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हे ही वाचा >> “…तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजे भोसलेंचं चॅलेंज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदींनी शूर्पणखा म्हटलेलं नाही”

दरम्यान, रेणुका यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही युजर्सचं म्हणणं आहे की, मोदी यांनी यात कुठेही ‘शूर्पणखा’ असं म्हटलेलं नाही. तसेच संसदेत एखादं वाक्य बोललं असेल तर त्यासाठी न्यायालयात जाता येत नाही, असा दावा काहींनी केला आहे.