काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. शस्त्रास्त्र घोटाळाप्रकरणी आरोपी असणाऱ्या संजय भंडारीशी निगडित लंडनमधील एका मालमत्तेचं रॉबर्ट वाड्रांनी नुतनीकरण करून तिथे वास्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्यांच्या संशयित सहभागाची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबर रोजी ईडीनं यूएईस्थित अनिवासी भारतीय चेरूवथूर चेकुट्टी थम्पी व ब्रिटिश रहिवासी सुमित चढ्ढा यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. २२ डिसेंबर रोजी राऊस अव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र दाखल करून घेतलं. ईडीनं यासंदर्भात प्राप्तीकर विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली होती.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तामध्ये ईडीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे. “संजय भंडारीच्या नावे लंडनमधील दोन मालमत्ता असून त्यांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात समावेश आहे. या मालमत्तांची करारप्रक्रिया व त्यांचा वापर यात चेरूवथूर चेकुट्टी थम्पी व सुमित चढ्ढा यांचा सहभाग असल्याची बाब ईडीच्या चौकशीत निष्पन्न झाली आहे”, अशी माहिती ईडीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. याच संदर्भात रॉबर्ट वाड्रा यांच्याही नावाचा समावेश ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

रॉबर्ट वाड्रांचा संबंध कसा?

दरम्यान, या सगळ्या प्रकरणात नेमका रॉबर्ट वाड्रा यांचा संबंध कुठे येतो? याबाबत माहिती देताना ईडीच्या प्रवक्त्यांनी थम्पी यांचं नाव घेतलं. “थम्पी हे रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय आहेत. वाड्रा यांनी चढ्ढाकरवी लंडनमधल्या दोन मालमत्तांपैकी १२ ब्रायनस्टोन स्क्वेअर या मालमत्तेचं फक्त नुतनीकरणच केलं नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्यही केलं आहे. त्याशिवाय वाड्रा व थम्पी यांनी फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून एकमेकांशी त्यांचे आर्थिक व्यवहारही आहेत”, अशी माहिती ईडीनं दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.