भाजपा खासदार रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जीला अटक करण्यात आली आहे. रॅश ड्रायव्हिंग अर्थात बेदरकारपणे गाडी चालवून ती धडकवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. WB 02 W 3182 या क्रमांकाची कार अत्यंत भरधाव वेगात चालवून एका भिंतीला त्याने धडकवली. रुपा गांगुली यांच्या मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

महाभारत या लोकप्रिय मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारुन रुपा गांगुली घराघरात पोहचल्या. दरम्यान त्यांच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून ती एका भिंतीला धडकवल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. आकाशला आज कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. आकाशचे कारवरचे नियंत्रण सुटले त्यानंतर ही कार एका भिंतीला जाऊन धडकली. रॉयल कोलकाता गोल्फ क्लबची ही भिंत होती. या घटनेत आकाशला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिक पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roopa gangurlys son akash mukherjee arrested for rash driving scj
First published on: 16-08-2019 at 11:46 IST