पीटीआय, मथुरा

धर्म, जात आणि विचारसरणीच्या नावाखाली फूट पाडू पाहणाऱ्या शक्तींपासून आपण सावध राहिले पाहिजे. आपण जात, भाषा किंवा प्रदेशाच्या आधारावर विभागलो गेलो तर आपला नक्कीच नाश होईल. त्यामुळेच हिंदू समाजाची एकजूट सर्वांच्या हितासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.

दीनदयाळ उपाध्याय गाय विज्ञान संशोधन व प्रशिक्षण केंद्र परिसरात आयोजित संघटनेच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या दोनदिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी ते पत्रकार परिषदेला संबोधित करीत होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच केलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ (फूट पडली तर विभागू) या वक्तव्यासंदर्भात बोलताना हिंदू समाज जर एकजूट राहिला नाही तर आजकालच्या भाषेत ‘बटेंगे तो कटेंगे’ स्थिती उद्भवू शकते, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : ओडिशात १.७५ लाख एकर पिकांचे नुकसान, दाना चक्रीवादळाचा परिणाम

u

हिंदूंची एकजूट लोककल्याणासाठी आहे. ती कायम राखणे आणि अन्य लोकांचेही भले करण्यासाठी हिंदू एकजूट राहणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही एकजूट कायम रहावी यासाठी प्रयत्न करीत आहोत. हे केवळ बोलून होणार नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, आचरणातही आणावे लागेल, यात दुमत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दत्तात्रेय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

वक्फला हिंदूच नव्हे मुस्लिमांचाही विरोध

संसदेत वक्फसंदर्भात आणलेल्या विधेयकाशी संबंधित प्रश्नावर बोलताना संयुक्त संसदीय समितीपुढे (जेपीसी) सुनावणी सुरू आहे. प्रत्यक्षात फार पूर्वी तयार केलेल्या वक्फ अधिनियमात २०१३ मध्ये केलेल्या दुरुस्तीमुळे भारतातच एक प्रकारे स्वंतत्र शाखा स्थापन झाली होती. यात सक्षम अधिकाऱ्यालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता, असे होसबळे म्हणाले. केवळ हिंदूंचाच या विधेयकाला विरोध आहे असे नाही तर मुस्लीम समुदायातील बऱ्याच व्यक्तींनीही जेपीसीसमोर आपले मत व्यक्त केले आहे, असे होसबळे म्हणाले. वक्फद्वारे केले जात असलेले अत्याचार आणि अन्यायाने त्रस्त असलेला हाच समाज असल्याचे ते म्हणाले.