नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात आयोजित केल्या जाणाऱ्या पथसंचलनावर अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला असून विद्यापीठ प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. रा. स्व. संघातर्फे रविवारी रात्री जेएनयू आवारात प्रथमच पथसंचालन आयोजित करण्यात आल्याचा दावा काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी केला.

हेही वाचा >>> रा. स्व. संघातर्फे रविवारी रात्री जेएनयू आवारात प्रथमच पथसंचालन आयोजित करण्यात आल्याचा दावा काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठ परिसरात या पथसंचलनाला परवानगी देण्याचा प्रकार ‘जेएनयू’च्या इतिहासात प्रथमच घडला आहे, असे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने सांगितले. रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्या गणवेशात जेएनयूच्या आवारात पथसंचलन केले आणि त्याची सांगता प्रशासकीय कार्यालयाजवळ केली, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य असलेल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.