राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चं तीन दिवसीय शिबीर रविवारी सुरू झालं आहे. या शिबीरात समाजवादी पार्टी प्रकरणी मुलायम सिंह यादव आणि शरद यादव यांना आदरांजली वाहिली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन, अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांनाही आदरांजली वाहण्यात आली आहे. बैठकीच्या पहिल्या सत्रात आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ज्या प्रसिद्ध व्यक्तींचं निधन झालं त्यांची नावं वाचली आणि त्यांना सगळ्यांनी आदरांजली वाहिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तीन दिवसीय शिबीर हरियाणातल्या समालखा मध्ये सुरू झालं आहे. यामध्ये गेल्या पूर्ण वर्षभरात ज्या प्रसिद्ध व्यक्ती दिवंगत झाल्या त्यांना आदरांजली वाहिली गेली. यामध्ये मुलायम सिंह यादव, शरद यादव, शांती भूषण यांच्यासह सतीश कौशिक यांच्या नावाचाही समावेश होता.

१२ ते १४ मार्च या कालावधीत संघाचं हे तीन दिवसीय शिबीर चालणार आहे. या शिबीरात आपल्या शताब्दी वर्ष विस्तार योजनेच्या अंतर्ग २०२२-२३ च्या कार्यांची माहिती दिली जाईल. तसंच २०२३-२४ या वर्षात काय काय करायचं आहे त्याचं लक्ष्य निर्धारित केलं जाणार आहे. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शिबीरात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह १४०० पदाधिकारी भाग घेणार आहेत. तीन दिवसांमध्ये विश्व हिंदू परिषदेसह संघाशी जोडल्या गेलेल्या ३४ संघटनांचे पदाधिकारी या तीन दिवसीय शिबिरात सहभागी होतील. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे देखील या ठिकाणी पोहचले आहेत.