रविवारी शिवजयंती साजरी करण्यावरून जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटना आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्या आरोप अभाविपच्या विद्यार्थ्यांनी केला. यावरून दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा – VIDEO : असदुद्दीन ओवेसींच्या दिल्लीतील घरावर दगडफेक; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

यासंदर्भात बोलताना अभाविपचे सचिव उमेशचंद्र अजमेरा म्हणाले, “शिवजयंतीनिमित्त आम्ही स्टुडंट अॅक्टिविटी सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवली होती. मात्र, एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी ही प्रतिमा बाहेर काढली. तसेच हार कचरापेटीत फेकून दिला.” पुढे बोलताना त्यांनी एसएफआयच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वातावरण दुषित करण्यात येत असल्याचा आरोपही केला. “एसएफआयच्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातील वातावरण दुषित करण्यात येत असून विद्यापीठ प्रशासनाने याविरोधात कठोर कारवाई करावी”, अशी मागणी त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एनएसयुआयकडून अभाविपचे आरोप फेटाळण्यात आले. “अभाविपकडून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र, अभाविपने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यापूर्वीच याठिकाणी काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवण्यात आली”, अशी प्रतिक्रिया एनएनयुआय सचिवांनी दिली.