महिन्याभरापासून चाललेलं रशिया युक्रेन युद्ध शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस भडकताना दिसत आहे. या युद्धामुळे जगभरात अशांतता निर्माण झाली असून सगळ्याच देशांचं लक्ष या युद्धाकडे लागलं आहे. या युद्धामुळे अण्वस्त्र हल्ल्याची टांगती तलवारही आहे. मात्र रशियाने अण्वस्त्रांच्या वापराबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सोमवारी पीबीएस न्यूजहॉरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “राज्याच्या अस्तित्वाला धोका असतानाच रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल.” ते पुढे म्हणाले, “आमच्याकडे एक सुरक्षा संकल्पना आहे जी अगदी स्पष्टपणे सांगते की जेव्हा राज्याच्या अस्तित्वाला धोका असतो तेव्हाच आपण तो धोका दूर करण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करू शकतो.”

हेही वाचा – Ukraine War: “रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांवर बलात्कार करत आहेत, एका महिलेच्या मुलांसमोरच…”
रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही दिवसांनंतर, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर केले की त्यांनी देशाच्या सामरिक अणुशक्तीला हाय अलर्टवर ठेवले आहे, जगावर टांगती तलवार आहे. आता, सोमवारी झालेल्या मुलाखतीत दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्याचा कोणताही परिणाम अण्वस्त्रांचा वापर करण्याचे कारण ठरणार नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia says it will use nuclear weapons only if countrys existence is threatened vsk
First published on: 29-03-2022 at 14:16 IST