भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकताच त्यांचा रशिया दौरा आटपून ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन लष्करातील भारतीयांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियातील अनेक भारतीय विद्यार्थी आणि तरुणांना रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियन लष्करात दाखल करून घेतलं होतं. हे भारतीय तरुण युद्धभूमीवर गेले होते. मात्र आता त्यांना युद्धाच्या मैदानातून परत बोलावण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया भेटीवर असताना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यासमोर रशियन लष्करातील भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश केल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर बुधवारी क्रेमलिनने याबाबत एक निवेदन जारी केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “आम्ही आमच्या सैन्यात सहाय्यक कर्मचारी म्हणून भारतीयांना दाखल करून घेतलं होतं. त्यांची भरती हे पूर्णपणे व्यावसायिक प्रकरण आहे.”

रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान अशा काही घटना समोर आल्या होत्या ज्यामध्ये भारतीय विद्यार्थी व तरुणांना नोकरीचं, उच्च शिक्षणाचं खोटं आश्वासन देऊन रशियाला पाठवण्यात आलं होतं. हे तरुण रशियाला गेल्यानंतर त्यांना रशिया-युक्रेन युद्धावर पाठवण्यात आलं. याचे काही व्हिडीओदेखील समोर आले होते. आतापर्यंत चार भारतीयांचा या युद्धाक बळी गेला आहे. तर ३० ते ४० जण अजूनही रशियात अडकले आहेत. मोदींनी रशिया दौऱ्यावर असताना हा मुद्दा उपस्थित केला होता.

Indian Students in Russian Army : भारतात फसवणूक करणारी टोळी सक्रीय

दुसऱ्या बाजूला गुन्हे अन्वेशन विभागाने भारतात एका अशा टोळीचा पर्दाफाश केला होता जी भारतातल्या तरुणांना, विद्यार्थ्यांना नोकरी व उच्च शिक्षणाचं अमिष दाखवून रशियाला पाठवत होती. तसेच मानवी तस्करी करत होती. ही टोळी भारतातल्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांना रशियातील मोठ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश करून देऊ असं सांगून तिकडे पाठवत होती. दरम्यान, मोदी यांनी रशिया दौऱ्यावर पुतिन यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर क्रेमलिनने रशियन सैन्यातील भारतीय तरुणांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा >> “युद्धाने प्रश्न सुटणार नाहीत, शांततेसाठी मी…”, रशिया-युक्रेन संघर्षावरून मोदींचा पुतिन यांना सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Modi Russia Visit : युद्धाने प्रश्न सुटत नाहीत : मोदी

दरम्यान, रशिया दौऱ्यावर असताना मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी “रशिया आणि युक्रेनदरम्यानचा प्रश्न युद्धभूमीवर सुटू शकणार नाही” असे मोदींनी पुतिन यांना सांगितलं. क्रेमलिनमध्ये भारत-रशिया शिखर परिषदेला सुरुवात करताना मोदी यांनी युक्रेन युद्धावरून भारताची भूमिका स्पष्ट केली. बॉम्ब, बंदुका आणि बुलेट याद्वारे शांतता चर्चा यशस्वी होत नाहीत, असही ते म्हणाले.