“माझी पत्नी आणि मुलगा युक्रेनमध्ये असताना मी इथे बसून राहू शकत नाही. युक्रेनचे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता पुतीन यांच्यामुळे धोक्यात आली आहे.” अशी फेसबुकवर पोस्ट करत लंडनमधील इयान उमने नावाचा इंग्रजी विषयाचा एक शिक्षक नोकरीचा राजीनामा देऊन, स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्यासाठी युद्धग्रस्त युक्रेनकडे रवाना झाला आहे. त्याने हे वन मॅन मिशन सुरू केले आहे. माझ्या कुटुंबाला माझी सर्वात जास्त गरज असल्याचं सांगत त्याने नोकरीचा राजीनामा दिला.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने कोणत्याही मार्गाने आपल्या कुटुंबाला भेटायचंच असा निश्चय केला आहे. “मी चार दिवस ताणतणाव, अस्वस्थ, दु:ख आणि रागात घालवले, पण आता मी माझी बॅग पॅक केली आहे, योजना आखली आहे, माझी पत्रे लिहिली आहेत. मी आता कोणत्याही प्रकारे माझ्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याच्या मार्गावर निघालो आहे. कृपया युक्रेनला आणि ज्यांना गरज आहे त्यांना पाठिंबा देत रहा” असं देखील त्याने आपल्या एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. तर, युक्रेनच्या वाटेवर असताना तो सोशल मीडियावर अपडेट देत होता आणि युक्रेनच्या पाठीशी उभा राहण्याचे आवाहन करत होता. त्यानंतर तो पत्नी नेलिया आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी युद्धग्रस्त युक्रेनकडे रवाना झाला.

युक्रेनला रवाना होण्या अगोदर त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो बॅग पॅक करताना दिसतोय. त्याने या व्हिडिओला कॅप्शनही दिले असून, माझ्या पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी मी युक्रेनला जात आहे., माझ्याकडे सर्व काही पॅक आहे, तिथे जास्त काही मिळणार नाही.’ असं त्याने त्यात म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलंडमधील क्राकोला जाण्यासाठी त्याने प्रथम मँचेस्टर विमानतळ गाठले. त्याने पोस्ट केली की, “मी येथे मँचेस्टर विमानतळावर आहे व गेटकडे जात आहे आणि नंतर क्राकोच्या विमानात जाणार आहे. मला पुढील अपडेट करायचे आहे की मी क्राकोमध्ये प्रवेश करू शकलो तर, वायफायवर असू शकेन. मी तिथे आहे हे सर्वांना माहीत आहे याची खात्री करा. तिथे. पण मुख्यतः मी जेव्हा युक्रेनच्या सीमेवर असेन तेव्हा मी तुम्हाला नंतर अपडेट देईन.’
यानंतरच्या व्हिडिओमध्ये, तो क्राकोच्या रेल्वे स्टेशनवरून चालत होता. यामध्ये तो म्हणतो “शहराच्या मध्यभागी जाणारी ती ट्रेन आहे, पुढचं ठिकाण बॉर्डर असेल, संपर्कात रहा.’ तर, सोमवारी सकाळी उमनीने आणखी एक पोस्ट केली, कारण त्याने युक्रेनची सीमा ओलांडली होती. तो म्हणाला, मी काल रात्री यशस्वीपणे युक्रेनमध्ये प्रवेश केला आणि आता आम्ही लिविव्हच्या बाहेर येत आहोत