रशिया आणि युक्रेन दरम्यान २४ फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची अनेक शहरे उद्ववस्त झाली आहेत. या दरम्यान युक्रेनच्या न्यायलयाने पहिल्या युद्ध गुन्ह्याच्या खटल्यात एका नि:शस्त्र नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी रशियन सैनिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वादिम शिशमारिन असे या रशियन सैनिकाचे नाव आहे.

वृद्धाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप
२१ वर्षीय रशियन टँक कमांडर वादिम शिशिमारिनवर ६२ वर्षीय युक्रेनियन वृद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे. २८ फेब्रुवारी रोजी कीवपासून सुमारे ३०० किमी अंतरावर असलेल्या चुखिवका भागातील एका गावात, वदिम शिशमारिनने रस्त्यावर एका वृद्धाची गोळ्या झाडून हत्या केली. युद्ध गुन्ह्यांव्यतिरिक्त, युक्रेनने इमारतींवर बॉम्बफेक करणे, नागरिकांची हत्या करणे, लूटमार आणि बलात्कार यांसारख्या प्रकरणांची सुनावणी सुरू केली आहे. त्याच वेळी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की सतत त्यांच्या बाजूने समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनमध्ये गुंतवणूक करण्याचे झेलेन्स्की यांचे आवाहन
झेलेन्स्की यांनी आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान झेलेन्स्की म्हणाले, “अनेक देशांतील मोठ्या कंपन्या रशिया सोडून जात आहेत. आम्ही या देशांना आणि कंपन्यांना रशिया सोडून युक्रेनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करतो. आम्हाला आमच्या देशाची पुनर्बांधणी करायची आहे. ” येथे आम्ही सर्व देशांना युक्रेनमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन करू. .” स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक सुरू आहे. झेलेन्स्की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाले होते.