काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात अतिरेक्यांनी भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे. गुरुवारी (२१ डिसेंबर) पुंछमधल्या थानामंडी भागात हा हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले, तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयशंकर म्हणाले, सीमेवर दहशतवादाशी सामना करताना भारत आता दुसरा गाल पुढे करण्याच्या मनःस्थितीत अजिबात नाही.

भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, आपला देश स्वतंत्र झाल्यापासून दहशतवादाशी लढतोय. बऱ्याचदा हे तथाकथित हल्लेखोर पाकिस्तानातून आले आहेत. पहिल्या दिवसापासून आपण दहशतवादाशी दोन हात करतोय. काही गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट आहेत त्यामुळे आपण सज्ज असलं पाहिजे.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले, आज आपल्या देशात काय बदललंय? मला वाटतं की, २६/११ हा टर्निंग पॉईंट होता. कारण या हल्ल्यापूर्वी लोक वेगळ्याच भ्रमात होते. परंतु, आता आपल्याला दहशतवादाशी दोन हात करावे लागतील. इथून पुढे एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करण्याची पद्धत चालणार नाही. आपल्या देशाच्या सीमेवर कोणी दहशतवादी कृत्यं करत असेल तर आपल्याला त्यांना सडेतोड उत्तर द्यावंच लागेल. एक गाल पुढे करून चालणार नाही.

हे ही वाचा >> “…जवानांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची जबाबदारी सरकारची”, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेनेची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला

गुरुवारी भारतीय लष्कराची वाहनं पूंछमधल्या बुफलियाजजवळील भागातून जवानांची वाहतूक करत होती, जिथे बुधवारी रात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. ही कारवाई डीकेजी (डेरा की गली), थानामंडी, राजौरी परिसरात केली जात आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास राजौरी-ठाणामंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात चार जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले.