संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही राज्यसभेत उपस्थिती लावली. राज्यसभेच्या सभापतींनी चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनचा ठराव मांडला. मग, सचिन या ठरावाला प्रतिसाद देणार नाही असे कसे होईल?  सचिनने अन्य खासदाऱांच्या मदतीने राज्यसभेत बाक वाजवून या ठरावाला पाठींबा दर्शविला.
संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला यांच्यासोबत सचिनचे राज्यसभेद आगमन झाले. आपल्या जागेवर बसण्यापूर्वी सचिनने अनेक खासदारांशी हस्तांदोलन केले. यावेळी सचिनची पत्नी अंजलीनेही प्रेक्षक कक्षातून सभागृहाचे कामकाज पाहिले.
राज्यसभेचे कामकाज दहा मिनिटांसाठी पहिल्यांदा तहकूब झाले, त्यावेळई सचिनशी हस्तांदोलन करण्यासाठी खासदारांनी त्याच्याभोवती गर्दी केली. त्या सगळ्यांचे समाधान करून, मग सचिनने पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.