समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्म आणि सनातन धर्म याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकतात आता पुन्हा एकदा त्यांनी तसंच विधान केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचंही नाव घेतलं आहे.

काय म्हणाले स्वामी प्रसाद मौर्य?

“हिंदू हा धर्म नाही तो एक धोका आहे. १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच हे म्हटलं होतं की हिंदू हा धर्म नसून ती फक्त एक जीवनशैली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनीही एकदा नाही तर दोनवेळा असं म्हटलं आहे की हिंदू हा धर्म नाही तर जीवन जगण्याची कला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही बाब म्हणून दाखवली आहे. हिंदू धर्माविषयी मी काही बोललं की सगळ्यांना मिरच्या झोंबतात. पण मी आज पुन्हा एकदा सांगतो हिंदू धर्म नाही तो एक धोका आहे.” दिल्लीतल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

मी बोलल्यावरच सगळ्यांच्या भावना दुखावतात का?

स्वामी प्रसाद मौर्य पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं हिंदू हा धर्म नाही. दोन महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांनीही याच आशयाचं वक्तव्य केलं होतं. जेव्हा मोहन भागवत, नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा असं काही बोलतात तेव्हा कुणाच्याही भावना दुखावत नाहीत. हिंदू हा धर्म नाही धोका आहे. काही लोकांसाठी हा धंदा आहे. मी या विषयी काही बोललो की लगेच लोकांच्या भावना दुखावतात” ANI ने हे वृत्त दिलं आहे.

सोमवारी म्हणजेच २५ डिसेंबरच्या दिवशी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महा ब्राह्मण पंचायत या कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यावेळी काही ब्राह्मण नेत्यांनी अखिलेश यादव यांच्याकडे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि तक्रारही केली. अखिलेश यादव यांनीही ही बाब मान्य केली की कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात अशा प्रकारे काही बोलणं गैर आहे.