सेबीने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात गेल्या तीन वर्षात शेअर बाजारातील ‘फ्यूचर अँड ऑप्शन’ ट्रेडिंगमुळे छोट्या गुंतवणूकदारांचे १.८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरूनच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सेबीला लक्ष्य केलं आहे. छोट्या गुंतवणूकदारांच्या तोट्यातून पैसे कमावणारे ‘मोठे खेळाडू’ कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासदंर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या पाच वर्षांत फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ४५ पटीने वाढ झाली आहे. तर गेल्या तीन वर्षांत ९० टक्के छोट्या गुंतवणूकदारांचे १.८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या छोट्या गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या तथाकथित ‘मोठ्या खेळाडूंची’ नावे सेबीने जाहीर करावीत.” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा – Rahul Gandhi portfolio: शेअर बाजाराच्या तेजीवर राहुल गांधींची शंका; मात्र मागच्या पाच महिन्यात स्वतः कमावले ‘इतके’ पैसे

हेही वाचा – Rahul Gandhi : शेअर मार्केटमध्ये रिस्क! “गुंतवणूकदारांनी पैसे गमावले तर…”, हिंडेनबर्ग प्रकरणावरून राहुल गांधींचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेबीच्या अहवालात नेमकं काय?

दरम्यान, सेबीने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, २०२३-२०२४ या वर्षात फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमुळे ७३ लाख व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे. त्यानुसार प्रत्येक व्यापाऱ्याचं सरासरी १.२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय फ्युचर्स आणि ऑप्शन्स करणाऱ्या एक कोटी पेक्षा अधिक व्यापाऱ्यांपैकी ९१ टक्के व्यापाऱ्यांना गेल्या तीन वर्षात म्हणजेच २०२२ ते २०२४ या आर्थिक वर्षात सरासरी प्रत्येकी २ लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. तर गेल्या तीन वर्षांत या सेगमेंटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचं एकूण नुकसान १.८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्यांचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.