करोना दुसर्‍या लाटेचा देशात प्रचंड मोठ्या प्रमाणात कहर पाहायला मिळाला. दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड आणि आवश्यक औषधांची कमी असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमावला लागला. आता दुसरी लाट ओसरत असताना त्याबाबत नवीन माहिती समोर आहे. दुसर्‍या लाटेदरम्यान, ब्रेकथ्रू इन्फेक्शन (लसीकरणानंतर संसर्ग) संबंधित आयसीएमआरचा अभ्यास समोर आला आहे. अभ्यासानुसार, कोविड -१९ च्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ मुळे देशातील जास्तीत जास्त लोकांना संसर्ग झाला. तसेच, लसीचे दोन्ही डोस घेतल्याने रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूण ६७७ लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे, जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. ६७७ लोकांपैकी ५९२ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. यापैकी ५२७ जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती तर ६३ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. तर ८५ लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला होता. १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून ही माहिती गोळा करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second wave people succumb to delta variant chance of death due to both doses of the vaccine decreased icmr study abn
First published on: 16-07-2021 at 13:54 IST