समलिंगी संबंध हा विषय नेमका काय आहे, याबाबात वाचकांना माहिती व्हावी यासाठी घेतलेला हा आढावा

समलैंगिक संबंध म्हणजे काय?
समलिंगी (होमो सेक्शुअल) ही नैसर्गिक अवस्था म्हणता येऊ शकते. ७ ते १४ या वयात ती जन्माला येते. या वयात येणार्‍या काही जणांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू शकते. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं/मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

समलैंगिक संबंध म्हणजे काय?
समलैंगिक असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलैंगिक संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध.

आणखी वाचा – समलिंगी विवाहाला मान्यता देणारा हा आहे पहिला आशियाई देश

गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय?
पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

समलैंगिक असणं अनैसर्गिक आहे का?
समलैंगिक असणं नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो.

आणखी वाचा – विश्लेषण: ‘या’ देशाने ‘गे रिलेशन’ला दिली परवानगी; भारतातही समलैंगिक विवाहांसाठी सुरु आहे न्यायालयीन लढाई

समलैंगिक असणं ही विकृती किंवा आजार आहे का?
समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला – स्त्रीचं, पुरुषाला – पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, भारतीय समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं.

समलैंगिक संबंध ठेवण्यामागे इतर कारणे?
पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यांना कमी धोकादायक वाटतं.

आणखी वाचा – “समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता द्या”, हैदराबादेतील जोडप्याची सर्वोच्च न्यायालयात धाव, आज याचिकेवर सुनावणी

समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे?
भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना मान्यता नाही; मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींला जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.