पीटीआय, अहमदाबाद
गुजरातच्या किनारपट्टीवर आलेल्या पाकिस्तानी जहाजातील ६०० कोटी रुपये किमतीचे ८६ किलो अमली पदार्थ तटरक्षक दलाने रविवारी जप्त केले. याप्रकरणी जहजावरील १४ खलाशांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सागरी सुरक्षा यंत्रणेने दिली.

अरबी समुद्रात शनिवारी रात्री दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्रभर चित्तथरारक कारवाई करत अमली पदार्थ जप्त करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

हेही वाचा >>>स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती

पाकिस्तानी बोटीतून कोणत्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले याबाबत तटरक्षक दलाने अद्याप खुलासा केलेला नाही. कारवाईसाठी तटरक्षक जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली होती. संशयित जहाज ओळखण्यासाठी आयसीजी जहाज राजरतनचा वापर करण्यात आला. अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या या जहाजातील १४ खलाशांना अटक केल्यानंतर त्यांना पोरबंदर येथे आणण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरात, राजस्थानात छापे, २३० कोटींचे एमडी जप्त

गुजरात व राजस्थानातील अमली पदार्थ तयार करणाऱ्या चार ठिकाणांवर छापे टाकून दहशतवादविरोधी पथकाने २३० कोटी रुपयांचे मेफ्रेडोन (एमडी) जप्त केले. या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली. अहमदाबादचे रहिवासी मनोहरलाल एनानी आणि राजस्थानचे कुलदीपसिंह राजपुरोहित यांनी मेफ्रेडोन निर्मिती सुरू केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाल्यानंतर गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी संयुक्तपणे छापे टाकले. एनानी आणि राजपुरोहित तसेच त्यांच्या साथीदारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती, त्यानंतर राजस्थानमधील सिरोही आणि जोधपूर येथील विभाग आणि गांधीनगरमधील पिपलाज गाव आणि अमरेली जिल्ह्यातील भक्तीनगर औद्योगिक परिसरात छापे टाकण्यात आले.