scorecardresearch

बिहार: जेवणानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी आणि उलट्या; १५६ जण रुग्णालयात दाखल

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

(Photo – ANI)

बिहारमध्ये १५०हून अधिक शालेय विद्यार्थांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी बिहार दिवसाच्या उत्सवादरम्यान दुपारचे जेवण घेतल्यावर पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती. सध्या १५० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

२२ मार्च मंगळवारी बिहार दिवस साजरा करण्यात आला. पाटणाच्या गांधी मैदानातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

पाटणा येथे बिहार दिनानिमित्त दुपारचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे १५६ हून अधिक विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नोंदणी केली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी बहुतेकांनी पोटदुखी आणि उलट्या झाल्याची तक्रार केली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विभा सिंह यांनी दिली.

सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले जात आहेत. अन्नातून हे झाल्याचं सध्या आम्ही गृहीत धरलंय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समितीही स्थापन केली आहे, असंही विभा सिंह म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Several students hospitalised after having lunch during bihar diwas celebrations in patna hrc

ताज्या बातम्या