सेक्स टेप प्रकरणात बलात्काराचे आरोप झालेला जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी जर्मनीत पळ काढला होता. आता तो भारतात येण्यासाठी जर्मनीहून निघाला आहे. म्युनिक विमानतळावरून त्याने बंगळुरूपर्यंतचा बोर्डिंग पास मिळवला आहे. सकाळी ११.२० वाजता त्याने विमान प्रवास सुरू केला. तर, उद्या ३१ मेपर्यंत तो भारतात परतू शकेल, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

प्रज्ज्वल रेवण्णा हा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार आहे. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात त्याने मतदान केले होते. त्यानंतर त्याच्या कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राईव्ह बाहेर काढण्यात आला. कर्नाटकमधील अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले असल्याचे यावरून सांगितले गेले. प्रकरण देशभरात पसरल्यानंतर कर्नाटक सरकारने याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. प्रज्ज्वल रेवण्णावर आतापर्यंत बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
Sanjay Raut on Dawood Ibrahim fact check video
संजय राऊतांनी दिले दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन? Viral Video मुळे राजकीय वर्तुळात खळबळ; वाचा सत्य घटना
Shikhar Dhawan Spotted With Mystery Girl At Airport Avoids Sharing Frames Video Goes Viral
Shikhar Dhawan Video: घटस्फोटानंतर शिखर धवन पुन्हा प्रेमात? मिस्ट्री गर्लबरोबरचा Video होतोय व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Bigg Boss Marathi 5 fame Nikki Tamboli was called vahini by paparazzi video viral
Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
rajpal yadav apologies fans
Video: अभिनेता राजपाल यादवने दिवाळीच्या दिवशी हात जोडून मागितली माफी, नेमकं काय घडलं?
navra maza navsacha 2
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

प्रज्ज्वल रेवण्णाने काही दिवसांपूर्वी आपला एक व्हिडीओ प्रसारित केला होता. ज्यामध्ये त्याने ३१ मे पूर्वी तपास यंत्रणासमोर उपस्थित राहून चौकशीत सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपल्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असाही दावा त्याने केला होता. तसेच हे प्रकरण उजेडात आल्यानंतर मी तणावात आहे आणि एकटा पडलोय, असेही त्यांनी सांगितले. हसन लोकसभेतील काही राजकीय शक्ती माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप रेवण्णाने केला.

हेही वाचा >> प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरणात मोठी अपडेट; खासदार रेवण्णाला उद्या भारतात आणले जाणार

तीन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये प्रज्ज्वल रेवण्णाने काँग्रेसवरही आरोप केले आहेत. “काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या इतर नेत्यांनी माझ्याविरोधात अपप्रचार केला. तसेच माझ्याविरोधात राजकीय कट रचला त्यामुळे मी खूप तणावात आहे”, असा दावा रेवण्णाने केला. माजी पंतप्रधान आणि रेवण्णाचे आजोबा एचडी देवेगौडा यांनी खुले पत्र लिहून रेवण्णाला शरणागती पत्करण्यास आणि चौकशीला सामोरे जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेवण्णाने व्हिडीओ मेसेज प्रसारित केला होता.

परराष्ट्र मंत्रालयाने बजावली होती नोटीस

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, २३ मे रोजी प्रज्वल रेवण्णाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या नोटीशीला १० दिवसांत उत्तर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दहा दिवसांत प्रतिसाद न दिल्यास पुढील नियमांनुसार कारवाई केली जाणार आहे. कर्नाटक सरकारने केंद्र सराकरला प्रज्वलचा खासदार म्हणून असलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने त्याला नोटीस बजावली.