लखनऊ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) येथील शाहीनबाग परिसरात निदर्शने सुरू असताना हवेत गोळाबार करणारा कपिल गुज्जर याला बुधवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र काही वेळातच त्याचे सदस्यत्व भाजपने रद्द केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कपिल गुज्जर याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळताच काही वेळातच त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले, असे उत्तर प्रदेश भाजपचे सरचिटणीस जेपीएस राठोड यांनी सांगितले.

बुधवारी बसपमधील काही युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामध्ये कपिल गुज्जरही होता. आम्हाला त्याचा शाहीनबाग प्रकरणात सहभाग असल्याची माहिती नव्हती, असे भाजपचे गाझियाबाद महानगरचे अध्यक्ष संजीव शर्मा यांनी सांगितले. शाहीनबाग प्रकरणातील त्याच्या सहभागाबाबतची माहिती मिळताच त्याचे सदस्यत्व तातडीने रद्द करण्यात आले, असे शर्मा म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने सुरू असताना कपिलने हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे त्याने पक्ष सदसत्व स्वीकारले होते. कपिल गुज्जरने १ फेब्रुवारी रोजी हवेत गोळीबार करण्याची घटना समाजमाध्यमावर मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाली होती. त्यात त्याने प्रक्षोभक भाषा वापरली होती. पोलीस बाजूला असतानाही त्याने हवेत दोन-तीन वेळा गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaheen bagh shooter kapil gujjar joins bjp canceled membership after political storm zws
First published on: 31-12-2020 at 02:06 IST