काँग्रेसचे खासदार शशी थरुर अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. कधी आपलं इंग्रजी तर कधी महिला खासदारांसोबत काढलेल्या सेल्फीमुळे, हे कधी कौतुकाचा, तर कधी वादाचा विषय ठरले आहेत. दरम्यान, सध्या थरुर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी नालालॅंडमधील एका महिलेच्या प्रश्नाला एकदम मजेशीर उत्तर दिलं आहे. थरूर यांनीही हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

हेही वाचा – VIDEO : शेतकऱ्याच्या घराजवळच वाघिणीने दिला चार बछड्यांना जन्म; आंध्र प्रदेशच्या नंद्याल जिल्ह्यातील घटना

नेमकं काय घडलं?

नुकताच शशी थरूर हे नागालॅंड येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी एक महिला त्यांना म्हणाली, ”मी तुमची चाहती आहे आणि माझ्या मनात तुमच्या विषयी बरचं कुहुतूल आहे”. तसेच तुम्ही इतके सुंदर आणि बुद्धीमान कसे आहात? याचं नेमकं रहस्य काय आहे? असा प्रश्नही महिलेने त्यांना विचारला.

हेही वाचा – नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, प्रसिद्ध केला व्हिडीओ

थरूर यांचं मजेशीर उत्तर

महिलेच्या प्रश्नावर बोलताना शशी थरूर म्हणाले, ”काही गोष्टी तुमच्या हातात नसतात, तर काही गोष्टी तुम्ही बदलवू शकता. तुम्ही कसे दिसता हे तुमच्या जीन्सवर अवलंबून असतं. त्यामुळे मी एवढेच सांगेन की, तुम्ही तुमच्या पालकांची निवड काळजीपूर्वक करा”, शशी थरूर यांच्या उत्तरानंतर सभागृहात मोठ्याने हशा पिकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना ते म्हणाले, ”तुम्ही कसे दिसता, याकडे लक्ष देण्यापेक्षा इतर स्वत:चं व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करा. विशेषतः तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत. मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. मी अनेक पुस्तके वाचली आहेत. पुस्तकांमुळे तुमच्या ज्ञानात भर पडते. पूर्वी भाषण देताना मला अनेक समस्या येत होत्या. मात्र, तुम्ही वारंवार जेव्हा याची प्रॅक्टीस करता, तेव्हा अनेक गोष्टी सोप्या होतात. तुमच्यात आत्मविश्वास वाढतो.