कन्हैय्या बिहारचा सुपूत्र; त्याने कोणतेही देशविरोधी वक्तव्य केले नाही- शत्रुघ्न सिन्हा

कन्हय्या कुमार याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती

Shatrughan Sinha, JNU row , Kanhaiya Kumar , anti national, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
BJP Shatrughan Sinha : आज कन्हय्या कुमारची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, त्याला दिल्ली कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

स्वपक्षाला वरचेवर घरचा आहेर देणारे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात उडी घेतली. आपल्या बिहारचा सुपूत्र आणि ‘जेएनयूएसयू’ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असणाऱ्या कन्हैय्याच्या भाषणाची प्रत मी वाचली आहे. त्याने कोणतेही देशद्रोही किंवा संविधानविरोधी वक्तव्य केलेले नाही, असे सिन्हा यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे. त्यामुळे तो लवकरच सुटेल अशी आशा आहे. तो जितक्या लवकर सुटेल तितके बरे होईल, असेही सिन्हा यांनी म्हटले. दरम्यान, आज कन्हैय्या कुमारची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असून, त्याला दिल्ली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र, कन्हैय्या कुमार याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने पीटीआयला दिल्याचे वृत्त आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shatrughan sinha wades into jnu row asserts kanhaiya kumar said nothing anti national

ताज्या बातम्या