गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱया शिवसैनिकांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोरारी बापू संघटनेच्या वतीने गुलाम अली यांना पुरस्कार वितरण सोहळा गुजरातच्या भावनगरमधील महुवा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांच्या गटाने गुलाम अलींच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरून दहा शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास दहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. कार्यक्रम सुरळीत पार पडल्यानंतर दीड वाजता त्यांना सोडण्यात आले, असे महुवा पोलीस ठाण्याचे अधिकारी वनराज मांजरिया यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित
गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध करणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात
कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांच्या गटाने गुलाम अलींच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 22-04-2016 at 16:57 IST
TOPICSगुलाम अली
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sainiks detained for protesting against ghulam ali bhavnagar visit