अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन बुधवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. या भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.

बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठलं होतं. मात्र या घटनेनंतर शिवसेना या पक्षाची हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. गर्वसे कहो हम हिंदू है हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा याच काळातला होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक अनोखं नातं होतं. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केलं जातं आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.