राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे आक्रमक नेते भाष्कर जाधव हे आपल्या गावाकडील शेतीत काम करताना दिसून आले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. भाष्कर जाधव हे सद्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी आपल्या कुटूंबियांसह राहत आहेत. येथेच शेतात भर पावसात ते शेतीतील कामे करताना दिसून येत आहेत.

भाष्कर जाधव हे आपल्या व्यस्त राजकीय कार्यक्रमांमधून वेळ काढत नेहमीच शेतीसाठी वेळ देतात. ते दरवर्षी गावी येऊन शेतात कामं करतात. भाष्कर जाधव यांचं एकत्र कुटुंब असून ते दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड करतात. राजकारण आणि समाजकारणा व्यस्त असूनही ते गावापासून दूर गेलेले नाही. ते आजही शेतीतली कामे मोठ्या उत्साहाने करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाष्कर जाधव हे गुहागरचे आमदार आहेत. मुंबईतील विधानसभेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर भास्कर जाधव हे कोकणात आपल्या गावी परतले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर भाषण करताना भास्कर जाधव यांनी शिवसेनेची बाजू मजबुतीने मांडली होती. त्यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षासाठी दोन पावले मागे यावे असे आवाहनही भाष्कर जाधव यांनी केले होते.