अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी चालू असताना त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुष्ठानावरही बरीच चर्चा रंगल्याचं दिसून आलं. त्यात आता मोदींचे नाशिकच्या काळाराम मंदिरात मॉपने फरशी पुसतानाचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. देशभरातल्या मंदिरांमध्ये साफसफाईची मोहीम यामुळे सुरू झाल्याचं बोललं जात आहे. पण याच फोटोच्या अनुषंगाने भाजपाच्या ‘मंदिर धोरणा’वर आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. “भाजपानं देशाच्या महान संस्कृतीचे डबके करून ठेवले आहे”, अशी परखड टीका ठाकरे गटानं केली आहे.

“भारतीय जनता पक्षाची नौटंकी”

“अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशभरात एक वेगळीच नौटंकी चालवली आहे. ही नौटंकी पाहून प्रत्यक्ष प्रभू श्रीरामही स्मित करीत असतील”, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. “केंद्रातले मंत्री, त्यांचे राज्याराज्यांतील मंत्री, भाजपचे पुढारी राममंदिर सोहळ्याच्या निमित्ताने गावोगावच्या मंदिरांत झाडू मारीत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळय़ातील हे कोणते धार्मिक अधिष्ठान म्हणायचे?” असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Anti-Maoist operations in India influence of Naxalism
छत्तीसगडमध्ये १८ नक्षलींचा खात्मा; देशात कुठे आहे नक्षलवादाचा प्रभाव?
kalyan, dombivali, Slow Progress, Palawa Chowk Flyover, Concerns, mns mla raju patil, criticise kdmc and mmrda, political interferance, x social media, dr srikant shinde, bjp, ravindra chavhan, mahrashtra politics, lok sabha 2024,
मनसेचे राजू पाटील म्हणतात, जगातील दहावे आश्चर्य डोंबिवलीत
Nepotism in four out of ten Lok Sabha constituencies in Vidarbha by all political parties including bjp
विदर्भातील सर्वपक्षीय घराणेशाही, भाजपही मागे नाही

“स्वच्छ मंदिरात झाडू मारून मोदींनी काय साध्य केले?”

“खरे तर पंतप्रधान येणार म्हणून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काळाराम मंदिर सफाईवर १०-१२ लाख खर्च करून साफसफाई केलीच होती. शिवाय मंदिराच्या विश्वस्त संस्थेनेही स्वतंत्र दोन-चार लाख खर्च करून सफाई करून घेतली होती ती वेगळीच. त्यामुळे ‘स्वच्छ’ झालेल् काळाराम मंदिरात झाडू मारून पंतप्रधानांनी काय साधले? एका फोटो उत्सवाची सोय झाली इतकेच”, असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.

विश्लेषण : एकनाथ शिंदे यांची ‘राम आणि काम’ ही रणनीती नेमकी काय आहे? ‘विकास पुरुष’ अशी नवी ओळख?

“आणखी एक केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भुवनेश्वर येथील मंदिरात जाऊन झाडू मारला. वैष्णव हे रेल्वेमंत्री आहेत. लोकल ट्रेन्स, रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड अस्वच्छता आहे, त्यांची प्रसाधनगृहे घाणेरडी आहेत. त्यामुळे खऱ्या साफसफाईची गरज तेथे आहे. मात्र ती सोडून हे महाशय मंदिराच्या स्वच्छ फरशीवर झाडू मारीत आहेत”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

“मालदीवसारखा पाच लाख लोकसंख्येचा देशही भारतावर…”

“देशाच्या सीमेवर गोंधळाचे चित्र आहे. मालदीवसारखा पाच लाख लोकसंख्येचा देशही भारतावर गुरगुरत आहे व देशाचे संरक्षणमंत्री मंदिरात झाडू मारीत आहेत. देशात बेरोजगारी, उपासमारी, बालकांचे कुपोषण सुरू आहे. आर्थिक विषमतेचा कहर आहे, पण पंतप्रधान मोदी अयोध्येनिमित्ताने धार्मिक अनुष्ठानात गुंतून पडले आहेत”, अशी खोचक टिप्पणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

“राममंदिर सोहळ्याच्या निमित्ताने मोदी दहा दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या उपवासामुळे देशातील ३५ टक्के लोकांची उपासमार थांबणार आहे काय? मोदी तीन दिवस मंदिरातच साध्या सतरंजीवर झोपणार आहेत. कश्मीरातील शेकडो कश्मिरी पंडित गेली अनेक वर्षे निर्वासितांच्या छावण्यांत अशाच पद्धतीने जीवन जगत आहेत. पंतप्रधानांच्या ‘सतरंजी’ उपक्रमाने पंडितांची घरवापसी होणार आहे काय?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.