Shubhanshu Shukla message to parents before Axiom-4 liftoff : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या तीन सहकाऱ्यांबरोबर मिळून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले. नासाच्या फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे अमेरिकेतील फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी अवकाशात उड्डाण केलं. यानिमित्ताने ४१ वर्षांनंतर भारतीय व्यक्ती अंतराळात गेली आहे. या ऐतिकासिक कामगिरीबरोबरच ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या पालकांबरोबर साधलेल्या संवादाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

शुक्ला यांचे वडील शंभू आणि आई आशा यांचे त्यांचा मुलागा अंतरालात झेपावताना पाहातानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान शुभांशू शुक्ला यांच्या वडीलांनी मुलाबरोबर झालेला संवाद काय होता याबद्दल माहिती दिली आहे. “आम्ही शुभांशूशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बोललो आणि तो म्हणाला, ‘पापा कर के आता हूँ, आप चिंता ना करो’ (पापा तुम्ही काळजी करू नका मी मोहिम पूर्ण करून येतो),” असे निवृत्त सरकारी अधिकारी शंभू यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

शुभांशू शुक्ला यांचे पालक आणि जवळच्या नातेवाईकांनी शुभांशू यांनी जेथे शिक्षण घेतले, त्या सिटी मॉन्टेसरी स्कूलने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात या मोहिमेचे प्रक्षेपण पाहीले.

त्याच्या १४ दिवसांची मोहिम यशासाठी आम्ही घरी सामूहिक प्रार्थनेचे नियोजन केले आहे. ईश्वर की कृपा बनी रहनी चाहिए (देवाची कृपा राहिली पाहिजे) , असे शंभू शुक्ला म्हणाले. तर शुभांशू शुक्ला यांची मोठी बहीण सुची यांनी सांगितलं की त्या दोघांचं अवघं ३० सेकंद बोलणं झालं. “तो म्हणाला की त्याला उत्सहित, आनंदी आणि निरोगी वाटतंय. आम्ही त्याला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या,” असे त्या म्हणाल्या.

शुभांशू शुक्ला हे १९८४ मध्ये राकेश शुक्ला यांच्यानंतर अवकाशात जाणारे इतिहासातील दुसरे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे जन्मलेले शुक्ला यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे आणि त्यांनी २००६ मध्ये भारतीय वायुदलात त्यांना नियुक्त करण्यात आले. त्यांना इलिट कॉम्बॅट एअरक्राफ्टचा २,००० तासांचा फ्लाइट एक्सपिरिएन्स आहे. २०१९ मध्ये त्यांची निवड भारताच्या गगणयान ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रामसाठी आणि नंतर ॲक्सिऑम मोहिम-४ साठी वैमानिक म्हणून निवड झाली.