काळा पैसा आणि भारतीयांनी आपला बेहिशेबी पैसा परदेशी बँकांमध्ये दडवून ठेवल्यासंदर्भात खास तपास करण्याप्रकरणी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) पहिली बैठक आज, सोमवारी येथे होत आहे.
निवृत्त न्या. एम. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला एसआयटीचे उपाध्यक्ष निवृत्त न्या. अरिजित पसायत आणि अन्य ११ उच्चस्तरीय तपास यंत्रणा तसेच विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. काळ्या पैशाचे परिणाम, यासंदर्भात सुरू असलेले तपासकाम तसेच सर्व विभागांकडे याबद्दल उपलब्ध असलेली माहिती यासंबंधी बैठकीमध्ये विचारविनिमय होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.