पीटीआय, देवरिया                                  

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील फतेहपूर गावामध्ये जमिनीच्या वादावरून सहा जणांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे हत्याकांड सोमवारी सकाळी लेहडा तोला या भागात घडले. याप्रकरणी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांच्या हत्येने या भयानक हत्याकांडाची सुरुवात झाली. यादव हे त्यांचे प्रतिस्पर्धी सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी गेले होते. त्या वेळी दुबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यादव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना ठार मारले अशी माहिती विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.

हेही वाचा>>>रक्तरंजित सोमवार! जमिनीचा वाद विकोपाला गेला, सहा जणांच्या हत्येने UP हादरले; घटनाक्रम आला समोर

या हत्येचा बदला घेण्यासाठी अभयपूर येथील यादव यांच्या समर्थकांनी दुबे यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी सत्यप्रकाश दुबे, त्यांची पत्नी किरण दुबे, सलोनी आणि नंदिनी या मुली आणि मुलगा गांधी यांची निर्दयीपणे हत्या केली असे पोलिसांनी सांगितले.  नंदिनी आणि मुलगा हे अल्पवयीन आहेत.

Story img Loader