six members of a family killed in Fire At UP's Firozabad rescue operation underway rvs 94 | Loksatta

UP Fire: फिरोजाबादमधील आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश

या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पीडित कुटुंबाला दोन लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे

UP Fire: फिरोजाबादमधील आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश
इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. (फोटो सौजन्य-एएनआय)

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये आगीच्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबांतील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत तीन लोक जखमी झाले आहेत. हे कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत या कुटुंबीयांनी जीव गमावला आहे. जसराना भागातील पढाम शहरात ही दुर्घटना घडली आहे.

प्रथमदर्शनी ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानासह पहिल्या मजल्यावरील दुकान मालकाचे घर जळून खाक झाले आहे. या घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पीडित कुटुंबाला दोन लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग

आग्रा, मैनपुरी, एटा आणि फिरोजाबाद येथील अग्निशमन दलाच्या १८ गाड्या आणि १२ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे बचावकार्य राबवण्यात येत आहे. दाटीवाटीची वस्ती असल्याने बचावकार्य राबवण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांनी दिली आहे. या इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांचा जवानांकडून शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 07:46 IST
Next Story
NDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर?