पोरबंदरचे खासदार आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसी विठ्ठल रडादिया यांचा मुलगा आमदार जयेश रडादिया यांच्यासह अन्य पाच जणांची गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नियुक्ती केली आह़े  मोदींनी शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली़
जयेश यांनीही जेटपूर येथून भाजपच्याच तिकिटावर आमदारकी मिळविली आह़े  मोदींनी गेल्या वर्षीच्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्याने समावेश केल्या मंत्र्यांमध्ये जम्बुसारचे आमदार छत्रसिन्ह मोरी, लिम्खेडचे आमदार जसवंतसिन्ह भाभोर, हलोलचे आमदार जयंद्रथसिन्ह परमार, चनास्माचे आमदार दिलीपसिन्ह ठकोर आणि अंजरचे आमदार वसन अहीर यांचा समावेश आह़े  त्यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आह़े  या वर्षांच्या सुरुवातीला भाजपमध्ये आलेल्या विठ्ठल रडादिया यांनी पोरबंदर पोटनिवडणुकीत आपली खासदारकी कायम राखली होती़  तसेच
 या सहा मंत्र्यांना गुजरातचे राज्यपाल कमला बेनीवाल यांनी मोदी आणि विधानसभेचे सभापती वजूवाला यांच्या उपस्थितीत शपथ दिली़  या नियुक्त्यांमुळे आता मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीसंख्या २२ झाली आह़े  २०१२च्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आह़े