‘इसिस’ या दहशतवादी संघटनेची आर्थिक बाजू सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेने दुजोरा दिला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात इसिसचा सालेह ठार झाला, असे अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने इराकमधील कारवाई तीव्र केली आहे.
अबू सालेहचे (४२) मूळ नाव मुअफ्फक मुस्तफा मुहम्मदअल-कर्मुश असून, तो मूळचा इराकचा होता. त्याच्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये त्याच्यासह दोन साथीदारही ठार झाले आहेत. हे दोघेही ‘इसिस‘च्या आर्थिक विभागाचेच काम पाहत होते. इसिसचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी असलेला सालेह हा मोजक्या लोकांपैकी असून तो सर्वात ज्येष्ठ व अनुभवी माणूस होता असे त्याचे वर्णन अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल स्टीव्ह वॉरेन यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘इसिस’चा अर्थमंत्री अबू सालेह हवाई हल्ल्यात ठार
अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेने दुजोरा दिला आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:

First published on: 11-12-2015 at 10:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slamic state finance chief abu saleh killed in air strike us