प्राग : स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारात गंभीर जखमी झाले. फिको बुधवारी दुपारी एका राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले असता हल्लेखोराने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी पोटाला लागून ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेतील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. स्लोवाकियाच्या पार्लमेंटच्या डेप्युटी स्पीकरनी या घडामोडींची पुष्टी केली आहे.

हेही वाचा >>> पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन; अमित शहा यांचा विश्वास

स्लोवाकियाची टीए३ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ब्रातिस्लावा येथून सुमारे १५० किलोमीटर अंतरावरील हांडलोव्हा शहरामध्ये हाऊस ऑफ कल्चर या इमारतीत फिको यांचा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हल्लेखोराने आधी इमारतीबाहेर चार गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने फिको यांच्यावर गोळीबार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युरोपीय महासंघाच्या महत्त्वाच्या निवडणुका होण्याच्या तीन आठवडे आधी ही घटना घडली आहे.