एकेकाळच्या उत्तम अभिनेत्री आणि आता केंद्रीय मंत्री व लोकसभेच्या खासदार असलेल्या स्मृती इराणी त्यांच्या भाषणांसाठी खूप लोकप्रिय आहेत. त्या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं, त्याद्वारे त्यांनी चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं दिली. त्यातला एक प्रश्न हा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल होता.

“…मग ती विचारधारा गेली कुठे?” वैभव मांगलेंचा राजकीय पक्षांना सवाल; म्हणाले, “दुसऱ्या पक्षाचे लोक…”

स्मृती इराणी यांनी ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनमधील अनेक प्रश्नांची थेट उत्तरं दिली. पण एका युजरने यावेळी त्यांना त्यांचे पती झुबिन इराणी यांच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर स्मृती इराणींनी दिलेल्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे. स्मृती इराणी यांना एका युजरने विचारलं, ‘तुम्ही तुमच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं आहे का?’ याला उत्तर देताना स्मृती म्हणाल्या, “मोना माझी बालपणीची मैत्रीण नाही.”

‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! पहिल्या दोन दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी तुफान कमाई, ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडला

स्मृती यांनी लिहिलं, “नाही सर… मोना माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे… त्यामुळे ती माझी बालपणीची मैत्रीण असण्याचा प्रश्नच येत नाही… ती एक कौटुंबिक व्यक्ती आहे, राजकारणी नाही, त्यामुळे तिला त्यात ओढू नका. माझ्याशी भांडा, माझ्याशी वाद घाला, माझा अपमान करा, पण ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तीला गटारात ओढू नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
smriti irani answer on marrying best friend husband
युजरचा प्रश्न व स्मृती इराणींनी दिलेलं उत्तर

दरम्यान, स्मृती इराणींचे पती झुबिन यांचं पहिला लग्न मोनाशी झालं होतं. दोघं वेगळे झाले, त्यानंतर झुबिन व स्मृती यांची भेट झाली, त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी २००१ मध्ये लग्न केलं होतं. झुबिन इराणी हे उद्योगपती आहेत.