केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या आजपर्यंत राजकारणाशिवाय त्यांच्या अभिनय कौशल्यासाठी आणि वक्तृत्व कलेसाठी ओळखल्या जायच्या. मात्र, दिल्लीत मंगळवारी पार पडलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फ‌ॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) पदवीदान सोहळ्यात त्यांचे वेगळे रूप पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चक्क शिट्टी वाजवली. बिनधास्तपणे तोंडात बोट घालून जोरदार शिट्ट्या वाजवणाऱ्या स्मृती इराणींना पाहून विद्यार्थ्यांना क्षणभर आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनीही शिट्ट्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनआयएफटी संस्थेचा पदवीदान सोहळा काल स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडला. इराणी यांनी यावेळी विद्यार्थांना पदव्या देऊन नेहमीप्रमाणे औपचारिक भाषण केले. या भाषणात त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं आवर्जुन कौतुक केलं. एका विद्यार्थ्यानं फॅशनमधील तंगालिया या दुर्मिळ प्रकाराचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लुप्त होत असलेले हे कलाप्रकार वाचविण्यासाठी आपण पुढे आलात तर मला अभिमान वाटेल, असे इराणी यांनी सांगितले.

स्मृती इराणी यांचा ‘द करण जोहर सेल्फी’!

काही दिवसांपूर्वीच इराणी यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला शेरोशायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे. १३ तारखेला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीका केली होती. कवी दुष्यंत कुमार यांच्या “भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ, आजकल दिल्ली मे जेरे-बहस ये मुद्दा” या ओळी ट्विट केल्या होत्या. जागतिक भूक निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला. यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले. यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही ट्विट केले आहे. ‘ऐ सत्ता की भूख-सब्र कर, आँकडे साथ नहीं तो क्या खुदगर्जों को जमा कर, मुल्क की बदनामी का शोर तो मचा ही लेंगे’ असे ट्विट करून प्रत्युत्तर दिले होते.

राहुल गांधींच्या टीकेला स्मृती इराणी यांचेही शेरोशायरीनेच उत्तर

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani seetis for nift grads smriti irani does more than just handing out degrees at convocation
First published on: 18-10-2017 at 12:12 IST