एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंटला तिच्या जेवणात सापाचे डोके आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २१ जुलै रोजी तुर्कीमधील अंकारा ते जर्मनीतील डसेलडॉर्फ या सनएक्सप्रेस फ्लाइटमध्ये घडली. त्याचा व्हिडीओ सद्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
फ्लाइट अटेंडंटने दिलेल्या माहितीनुसार, काही कर्मचारी दुपारचे जेवण करत असताना त्यांना त्यांच्या जेवणात सापाचे डोके आढळले. यावेळी त्यांचे अर्ध्यापेक्षा जास्त जेवण झाले होते. दरम्यान, या प्रकारानंतर एअरलाइन्सने अन्न पुरवठा करणाऱ्या कंपनीशी असलेला करार तात्पुरता रद्द केला आहे.
यासंदर्भात बोलताना एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी या प्रकणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे. तसेच अन्न पुरवठा करणाऱ्या कंपनीशी असलेला करार तात्पुरता रद्द केला असल्याचेही ते म्हणाले. तर हा प्रकार अनावधानाने झाला असल्याचे अन्न पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.