बैद्यनाथ या प्रसिद्ध आयुर्वेद औषध कंपनीच्या उत्पादनांमध्ये मानवी सेवनास घातक इतके शिसे व पाऱ्याचे प्रमाण आढळून आले आहे, त्यामुळे शहरातील लोकांनी ही औषधे वापरण्याचे थांबवावे, असे आदेश न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. या औषधांमध्ये असलेले शिसे व पाऱ्याचे प्रमाण घातक प्रमाणात आहे.

बैद्यनाथची आयुर्वेदिक औषधे वापरणे ताबडतोब थांबवावे व ज्यांनी ती घेतली असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन चाचण्या कराव्यात कारण शिसे व पारा हे दोन्ही जड धातू आहेत, असे आरोग्य विभागाने पुढे म्हटले आहे. श्री बैद्यनाथ कंपनीने तयार केलेल्या औषधात आर्सेनिक, शिसे व पाऱ्याचे प्रमाण जास्त आढळले आहे. आजूबाजूच्या दुकानात या औषधांची विक्री थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वच औषधात या धातूंचे प्रमाण जास्त आहे, पण त्यात औषधी गुण असल्याने ते या औषधांमध्ये मिसळले जात असतात. आयुर्वेदिक औषधांची सुरक्षा चाचणी केलेली नसते असे ब्यूरो ऑफ एन्व्हरॉनमेंटल डिसीज अँड इंज्युरी प्रिव्हन्शन खात्याच्या सहायक आयुक्त नॅन्सी क्लार्क यांनी सांगितले. ही उत्पादने माणसासाठी सुरक्षित नाहीत व त्यांची विक्री बंद करावी व लोकांनीही त्याचा वापर बंद करावा असे त्यांनी सांगितले.
आर्सेनिक (३ पीपीएम), शिसे (२ पीपीएम), पारा (१ पीपीएम) या सुरक्षित प्रमाणापेक्षा औषधातील प्रमाण जास्त आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिन ऑफ द नॅशनल अ‍ॅकडेमिक्स या संस्थेच्या अन्न व पोषण मंडळाने म्हटले आहे.

बैद्यनाथचे स्पष्टीकरण

बैद्यनाथच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाने सांगितले की, कंपनी या प्रकारात लक्ष घालणार आहे, न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने आमच्याशी संपर्क साधलेला नाही. शिवाय बैद्यनाथ अमेरिकेला औषधे निर्यात करीत नाही. त्यामुळे ती औषधे बैद्यनाथची आहेत की दुसऱ्या कंपनीची हा प्रश्नच आहे.

धातूंचे प्रमाण घातक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैद्यनाथच्या औषधात पाऱ्याचे प्रमाण २७ हजार पीपीएम, शिशाचे ४७० पीपीएम तर आर्सेनिकचे २४० पीपीएम इतके आढळून आले आहे. या धातूंमुळे मेंदू, मूत्रपिंड व चेतासंस्था व पुनरुत्पादन संस्थेवर परिणाम होतात.