Sonia Gandhi : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या शिमला या ठिकाणी आजारी झाल्या. ज्यानंतर त्यांना इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय शिमला या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना प्रकृतीचा थोडा त्रास जाणवू लागला. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्या उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

सोनिया गांधींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती

सोनिया गांधी शिमला दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती अचानाक बिघडली. ज्यानंतर त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे सचिव नरेश चौहान यांनी माध्यमांना दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनिया गांधी मुलीच्या घरी असताना झाल्या आजारी

सोनिया गांधी या त्यांची कन्या प्रियांका गांधी यांच्या घरी थांबल्या होत्या. सकाळी त्यांची प्रकृती थोडी बिघडली. ज्यानंतर काही वेळाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोनिया गांधी या ७८ वर्षांच्या आहेत. त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांच्या नियमितपणे वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. सोनिया गांधी मागच्या रविवारी शिमला या ठिकाणी आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.