तेलंगण राज्याच्या निर्मितीसंदर्भातील मुद्दय़ांबाबत तयार करण्यात आलेल्या विशेष मंत्रिगटाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. आंध्र प्रदेशचे विभाजन आणि तेलंगणा विधेयकाचा मसुदा तसेच नव्या राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया आदी मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ तेलंगण राज्याविषयीची चर्चाच केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. नव्या राज्याच्या निर्मितीसाठी कोणकोणते पर्याय व्यावहारिकदृष्टय़ा शक्य आहेत, त्याची चाचपणी केली जाईल आणि मग सर्वात चांगला पर्याय कोणता यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हैद्राबाद शहर कोणत्या राज्यात जाणार हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. विभाजन झाल्यास, सीमांध्र भागातील नेते आपल्या जीविताची तसेच स्थावर-जंगम मालमत्तेची हमी सातत्याने सरकारकडे मागत आहेत, त्यामुळे या बाबीवरही बैठकीत खल होणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2013 रोजी प्रकाशित
तेलंगणविषयी मंत्रिमंडळाची ३ डिसेंबर रोजी विशेष बैठक
तेलंगण राज्याच्या निर्मितीसंदर्भातील मुद्दय़ांबाबत तयार करण्यात आलेल्या विशेष मंत्रिगटाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक येत्या ३ डिसेंबर रोजी होणार आहे,
First published on: 30-11-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special cabinet meeting on december 3 to discuss telangana shinde