स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अजित चंडिला याच्या क्रिकेट किटमधून पोलिसांनी सोमवारी २० लाख रुपये जप्त केले. हे किट चंडिलाने आपल्या नातेवाईकांच्या घरी ठेवले होते.
दिल्ली पोलिसांनी गेल्या गुरुवारी मुंबईतून अजित चंडिला याला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक केली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चंडिलाने आपल्या गोलंदाजीतील एका षटकामध्ये किती धावा द्यायच्या, हे आधीच बुकींबरोबर ठरवले होते. बुकींशी त्याने फोनवरून साधलेल्या संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. चंडिला आणि दोन बुकींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी या तिघांना सोमवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्येही नेण्यात आले होते.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाने एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तिघांविरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार सोमवारी दिल्ली पोलिसांकडे केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2013 रोजी प्रकाशित
चंडिलाच्या क्रिकेट किटमधून २० लाख जप्त
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेला राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अजित चंडिला याच्या क्रिकेट किटमधून पोलिसांनी सोमवारी २० लाख रुपये जप्त केले.
First published on: 20-05-2013 at 07:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing rs 20 lacs seized from chandilas cricket kit