कोलंबो : अभूतपूर्व आर्थिक आणि राजकीय संकटाला सामोरे जात असलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळू लागली आह़े देशात एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलसाठा शिल्लक असून, इंधनाची तजवीज करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी सोमवारी स्पष्ट केल़े   ‘‘देशातील नागरिकांसाठी पुढील काही महिने खडतर असतील़  देशात रोज १५ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहू शकेल़ ही परिस्थिती दुखद आह़े मात्र, हे वास्तव जनतेपासून लपवण्यात अर्थ नाही़ जनतेने या परिस्थितीवर मात करून पुढे जाण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन विक्रमसिंघे यांनी केल़े