आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक धर्मगुरू श्री. श्री. रविशंकर यांच्याकडून भाजपचे प्रचारचिन्ह असणा-या ‘कमळा’चा अनोख्या पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे. हिंदू पुराणकथांनुसार संपत्तीची देवता लक्ष्मी कमळावर विराजमान असल्याचे श्री.श्री. रविशंकर यांनी आपल्या भक्तांना सांगितले. त्याचप्रमाणे मरणासन्न अवस्थेत असणा-या देशाला वाचविण्यासाठी बदल घडवून आणण्याचे आवाहनसुद्धा त्यांना आपल्या भक्तांना केले. तसेच आम आदमी पक्ष हा सच्चा असला तरी राजकीय दृष्ट्या कच्चा असल्याचेसुद्धा श्री.श्री. रविशंकर यांनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले. दिल्लीमधील वसंत विहार भागातील एका मेळाव्यात संपत्तीची देवता लक्ष्मी आणि कमळाच्या महत्वपूर्ण नात्याची जाणीव रविशंकर यांनी आपल्या भक्तांना करून दिली. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेशी संबंधित असणारे भाजपचे दिल्लीतील उमेदवार महेश गिरी यांनी बुधवारी श्री. श्री. रविशंकर यांची भेट घेऊन आपल्या प्रचाराला सुरूवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2014 रोजी प्रकाशित
अध्यात्मिक धर्मगुरू श्री.श्री. रविशंकर यांच्याकडून ‘कमळा’चा अनोखा प्रचार
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक धर्मगुरू श्री. श्री. रविशंकर यांच्याकडून भाजपचे प्रचारचिन्ह असणा-या 'कमळा'चा अनोख्या पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे.

First published on: 20-03-2014 at 04:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri sri wisdom for followers lakshmi always rides on lotus